Anant Ambani And Radhika Merchant Wedding Inside Video : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या समारंभात गेल्या दोन दिवसांपासून देश-विदेशातील मान्यवर सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. १२ जुलै रोजी अनंत-राधिकाचा शाही विवाहसोहळा मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्यातील बरेच Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अंबानी कुटुंबीयांनी लाडक्या सुनेच्या स्वागतासाठी संगीत समारंभात एकत्र डान्स केल्याचं याआधी पाहायला मिळालं होतं. आता मुख्य लग्नसोहळ्यात लाडक्या जावयाच्या स्वागतासाठी राधिका मर्चंटच्या आईने सुंदर असा डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…
Ghateshwar Shiv Temple shindewadi
पुण्यापासून फक्त ५० किमीवर आहे सुंदर तलावाच्या काठी हे शिवमंदिर, VIDEO एकदा पाहाच
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding first photo
नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष
live pig killed on stage
Ramayana demon role: स्टेजवरच जिवंत डुकराला मारून मांस खाल्लं, रामायणात राक्षसाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचं धक्कादायक कृत्य
Muramba
Video: “आता राजा-राणीचा संसार…”, संकटावर मात करत रमा-अक्षय आले एकत्र; ‘मुरांबा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी म्हणाले, “कोणताच काटा…”
Shankaracharya inaugurates Ghatsthapana at Khandoba fort in Jejuri pune print news
जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना; चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

हेही वाचा : Anant Ambani Wedding Reception : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या रिसेप्शनला मराठमोळ्या अमृता खानविलकरची हजेरी, अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडीओ

अनंत अंबानींच्या सासूबाईंचा सुंदर डान्स

राधिकाची आई शैला व बहीण अंजली मर्चंट यांनी सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग असलेल्या “मिथिला का कण-कण खिला, जमाई राजा राम मिला।” या गाण्यावर सुंदर असा डान्स केल्याचं अंबानी अपडेट्स या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अनंतसाठी सुंदर असा डान्स करत सासूबाई शैला यांनी लाडक्या जावयाचं स्वागत केलं. त्यांच्या या सुंदर डान्सचं सध्या कौतुक करण्यात येत आहे.

अनंत व राधिकाच्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणबीर कपूर, सिद्धार्थ-कियारा, रितेश-जिनिलीया, माधुरी दीक्षित, अर्जुन कपूर, जान्हवी, खुशी, अनन्या, सारा अली खान, सलमान खान, रजनीकांत, शाहरुख खान, रेखा, ऐश्वर्या राय, अमिताभ व जया बच्चन, प्रियांका चोप्रा असे बरेच कलाकार या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा : Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात ‘या’ कलाकारांना दिली २ कोटींची भेटवस्तू; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच एवढ्या उत्साहात…”

anant ambani
अनंत अंबानी लग्न

हेही वाचा : Anant Ambani Wedding: “जय गनेस” म्हणत मराठी अभिनेत्याची अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट, म्हणाला, “लग्नातील सेट, कपडे भाड्याने…”

दरम्यान, सध्या सर्व स्तरांतून अनंत-राधिकावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय नीता अंबानी यांनी स्वत: पुढाकार घेऊन या लग्नात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच काही चुकभूल झाली असल्यास समजून घ्या असं देखील त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

Story img Loader