भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चंटचा प्री- वेडिंग सोहळा पार पडला. गुजरातमधील जामनगरमध्ये या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात जगभरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी हजेरी लावली होती. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत अनेक कलाकार या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये दाखल झाले होते. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अनंत व राधिकाच्या प्री वेडिगं कार्यक्रमासाठी २ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये जय्यद तयारी करण्यात आली होती. पाहुण्यांसाठी कार्यक्रमस्थळी आलिशान तंबू बांधण्यात आले होते. या तंबूमध्ये फ्रिज, एसी, टिव्ही सारख्या सगळ्या आत्याधुनिक सुविधा देणयात आल्या होत्या. एवढंच नाहीतर तीन दिवस चाललेल्या सोहळ्या पाहुण्यांसाठी तब्बल २५०० निरनिराळ्या पदार्थांची मेजवाणही ठेवण्यात आली होती.
हेही वाचा- VIDEO : ‘ये हैं मोहब्बतें’मधील रुहीने खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार, किंमत तब्बल…
अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जाते. अंबानी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याकडे महागड्या वस्तूंचा खजिना आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी मुकेश अंबानी यांनी तब्बल १२६० कोटी रुपये खर्च केले आहेत. मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी व लेक ईशा अंबानीच्या लग्नातही कोट्यावधी रुपये खर्च केले होते.