Anant Ambani-Radhika Merchant Haldi Video: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे लग्न १२ जुलै रोजी झाले. त्यांचा हळदी समारंभ ८ जुलै रोजी अँटिलियामध्ये झाला होता. त्यांच्या हळदी समारंभातील एक इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये अंबानी व मर्चंट कुटुंबीय एकमेकांना हळद लावताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला रणवीर सिंह (Ranveer Singh), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), सलमान खान, रणवीर सिंह, ओरी, अनन्या पांडे, सारा अली खान, मानुषी छिल्लर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, बोनी कपूर, वेदांग रैना यांच्या अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अँटिलियामध्ये मोठ्या थाटामाटात अनंत व राधिकाचा हळदी समारंभ पार पडला होता. या कार्यक्रमात राहुल वैद्यने परफॉर्म केलं होतं. या सोहळ्यातील व्हिडीओत रणवीर व हार्दिकच्या डान्सची झलकही पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानी महिला नेत्याबरोबरचा मुकेश अंबानी यांचा फोटो व्हायरल, तिच्या पतीने कॅप्शनमध्ये लिहिलं…

व्हिडीओमध्ये अनंत आई नीता अंबानींना हळद लावताना दिसतो. हळदीने भरलेले भांडे तो आईवर ओततो, तसेच तो हार्दिक पंड्याबरोबरही हळद खेळताना दिसतो. या व्हिडीओत रणवीर सिंहची धमाल पाहायला मिळते. त्यानंतर अनंत वडिलांना हळद लावतो, तर मुकेश अंबानी पत्नी नीता यांना हळद लावताना दिसतात. त्यानंतर अनंत सासरे विरेन मर्चंट यांच्याबरोबर हळद खेळतो. दुसरीकडे राधिका तिच्या आईला हळद लावताना दिसते.

अनंत-राधिका यांच्या हळदीतील काही खास क्षण

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

या व्हिडीओत राधिका जाऊबाई श्लोका मेहता व आजी सासू कोकिलाबेन अंबानी यांच्याबरोबर थिरकताना दिसते. त्यानंतर हार्दिक व रणवीर सिंह अनंत-राधिकाच्या हळदीत धमाल डान्स करतात. एकमेकांवर फुलांच्या पाकळ्या व हळदीचा वर्षाव करताना पाहुणे या व्हिडीओत दिसतात. अनंत व राधिका यांच्या हळदीतील हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

पाहा अनंत-राधिकाच्या हळदी समारंभाचा व्हिडीओ

‘विरल भयानी’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. काहींना हा व्हिडीओ सुंदर असल्याचं म्हटलं आहे. तर काहींना यातील रणवीर सिंहचा एनर्जेटिक डान्स सर्वात जास्त आवडला. काहींनी हार्दिक पंड्याला मनसोक्त नाचताना पाहून आनंद व्यक्त केला आहे. ‘रणवीर सिंह व हार्दिक पंड्या यांनी पैसा वसून एंजॉय केलं’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Video: अनंत-राधिकाच्या हळदीत अनिल अंबानींच्या सूनेवर खिळल्या नजरा, सासूबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; काय करते क्रिशा शाह?

अनंत व राधिकाचे लग्न व रिसेप्शन झाले असले तरी अंबानी कुटुंबीय लंडनमध्ये या दोघांच्या लग्नाच्या पार्टीचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अंबानी कुटुंबाने दोन महिन्यांसाठी एक सेव्हन स्टार हॉटेल बूक केल्याची चर्चा आहे.