Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: मुकेश व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. १२ जुलैला राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करून अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत. १ जुलैपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल, ५ जुलैला संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह विविध क्षेत्रातील मंडळींनी खास हजेरी लावली होती. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच अनंत-राधिकाच्या एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मार्च महिन्यात अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला. गुजरातमधील जामनगरमध्ये पहिला प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर झाला. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत झालेल्या दुसऱ्या प्री-वेडिंगची चर्चा चांगलीच रंगली. तेव्हापासून अनंत-राधिकाच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. १२ जुलैला होणार हा शाही लग्नसोहळा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सध्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत.
हेही वाचा – Video: रश्मी ठाकरे यांची लेक तेजसबरोबर अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला खास हजेरी, लूकने वेधलं लक्ष
५ जुलैला झालेल्या संगीत सोहळ्यासाठी अनंत-राधिकाने खास लूक केला होता. राधिका मर्चंटने गुलाबी आणि पिस्ता रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्यावर तिने नेकलेस, छोटे कानातले आणि मोकळे केस ठेवलं होते. राधिका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अनंत अंबानी काळ्या आणि त्यावर सोन्याचं वर्क असलेल्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाले. यावेळी दोघांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अनंत-राधिका संगीत सोहळ्यातून पापाराझींना फोटोकरिता पोज देण्यासाठी बाहेर आले. फोटोसाठी पोज दिल्यानंतर दोघांनीही पापाराझींना जेवून जाण्याचा आग्रह केला. याचा व्हिडीओ फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत, अनंत पापराझींना म्हणताना दिसतोय की, सर्वांनी जेवून जा. तसंच दुसऱ्या व्हिडीओमध्ये राधिका देखील पापराझींना जेवून जाण्यासाठी सांगताना दिसत आहेत. दोघांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
हेही वाचा –Video: अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमात डफली वाजवत ओरीचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
दरम्यान, अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने परफॉर्मन्स केला. माहितीनुसार, जस्टिन बीबरला या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी ८४ कोटी रुपये मोजले आहेत. याआधी झालेल्या अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्येही जगप्रसिद्ध पॉपस्टार्सचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. पहिल्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाने तर दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये कॅटी पेरीने परफॉर्मन्स केला होता. या दोघींना देखील अंबानींनी तगड मानधन दिलं होतं.