Anant Radhika in Jamnagar: अनंत अंबानी (Anant Ambani) व राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे लग्न शुक्रवारी (१२ जुलै रोजी) मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडले. लग्नानंतर याच ठिकाणी शुभ आशीर्वाद समारंभ व रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास रिसेप्शन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. अखेर आता या लग्नाचे मुंबईतील सर्व सोहळे झाले असून अनंत व राधिका लग्नानंतर दुसऱ्या शहरात पोहोचले आहेत.
अनंत व राधिका लग्नानंतर लंडनला जाणार आहेत, अशी चर्चा होती. पण ते विदेशात गेले नसून लग्नानंतर ते सर्वात आधी गुजरातमधील जामनगरला पोहोचले. याठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जामनगरमधील काही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात नवविवाहित जोडप्याचं जामनगरकरांनी शाही थाटात केलेलं स्वागत पाहायला मिळत आहे.
अनंत-राधिकाचे विमानतळावर झाले जंगी स्वागत
अनंत व राधिकाच्या स्वागतासाठी जामनगर विमानतळावर गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशे वाजवून या नवविवाहित जोडप्याचं स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. इथे काही महिलांनी या जोडप्याचं औक्षण करून स्वागत केलं. त्यानंतर विमानतळावरून अनंत व राधिका कारमध्ये बसले. कारमधून त्यांची जामनगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली. काही पापाराझी अकाउंट्सनी या जंगी स्वागताचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
जामनगरमध्येच झाला पहिला प्री-वेडिंग सोहळा
अनंत व राधिका यांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा १ ते ३ मार्च २०२४ दरम्यान याच जामनगरमध्ये पार पडला होता. या सोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते, क्रीडा क्षेत्रातील मंडळी, उद्यागपती व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटी उपस्थित होते. त्या सोहळ्यानंतर आता पुन्हा एकदा लग्नानंतर अनंत-राधिका जामनगरला पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांच्या लग्नानिमित्त काही खास कार्यक्रम आहे की नाही याबाबत माहिती समोर आलेली नाही.
अंबानी कुटुंबाचं जामनगरशी नातं काय?
नीता अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबाचं जामनगरशी असलेलं नातं सांगितलं होतं. “संपूर्ण अंबानी कुटुंबाचं जामनगरशी घट्ट नातं आहे. अनंतच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला. त्याचे आजोबा धीरूभाई अंबानी यांनी जामनगरमधूनच व्यवसाय सुरू केला होता. मुकेश अंबानी यांनीही जामनगरमधील कौटुंबिक व्यवसाय सांभाळला आणि इथेच ते व्यवसायाचे बारकावे शिकले,” असं नीता अंबानी म्हणाल्या होत्या.