Anant Ambani And Radhika Merchant Wedding First Photo : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला आहे. या सोहळ्याला देश – विदेशातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुक्रवारी ( १२ जुलै ) सायंकाळपासून सुरुवात झाली. यादरम्यान अंबानी कुटुंबीयांनी लग्नमंडपात रॉयल एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळलं होतं. परंतु, राधिकाचा लूक मीडियासमोर आला नव्हता. नववधू राधिका लग्नात नेमका कोणता लूक करणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

हेही वाचा : सपने मे मिलती है…; अनंत अंबानीच्या लग्नात प्रियांका चोप्रा, रणवीर अन् अनिल कपूर यांचा ‘झकास’ डान्स! पाहा व्हिडीओ

अखेर राधिका मर्चंटचा लग्नसोहळ्यातील पहिला लूक अबू जानी – संदीप खोसला यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. अनंत अंबानींची नवरी लग्नात खास गुजराती ‘पाणेतर’ लेहेंगा घालून सजल्याचं पाहायला मिळत आहे. राधिकाने गुजराती परंपरेनुसार लग्नात ऑफ व्हाइट रंगाचा सुंदर असा लेहेंगा, हातात चुडा, लाल रंगाची शाल, भरजरी दागिने असा रॉयल लूक केला होता. तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंबानींच्या धाकट्या सूनेच्या या सुंदर अन् साध्या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : अंबानींच्या लग्न सोहळ्याला पतीसह पोहोचली प्रियांका चोप्रा! फोटो काढताना निक जोनसने केलं असं काही…; सर्वत्र होतंय कौतुक

अंबानींची धाकटी सून राधिका मर्चंट कोण आहे?

राधिका मर्चंटचा जन्म १८ डिसेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला. ती एनकोर हेल्थकेअरचे सीईओ विरेन आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाने तिचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, इकोले मॉन्डिएल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर बीडी सोमानी आंतरराष्ट्रीय स्कूलमधून तिने डिप्लोमा पूर्ण केला. राधिकाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार तिने राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयात २०१७ मध्ये पदवी संपादन केली आहे. सध्या, ती वडिलांच्या एनकोर हेल्थकेअरमध्ये संचालक म्हणून काम पाहते. राधिका ही होणाऱ्या सासूबाई नीता अंबानी यांच्याप्रमाणे उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे. श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून तिने प्रशिक्षण घेतलं आहे.

Story img Loader