Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा वर्षभरापासून सुरू होती. अखेर तो क्षण आलाच. १२ जुलैच्या रात्री अनंत आणि राधिकाने सप्तपदी घेऊन सात जन्मांचं वचन घेतलं. दोघांचा हा भव्य लग्नसोहळा अविस्मरणीय ठरला.

अनंत-राधिकाच्या या विवाहसोहळ्यात भारतासह जगभरातील प्रसिद्ध आणि नामवंत मंडळींनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच बॉलीवूड कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळीही या लग्नात उत्साहाने सामील झाली होती. मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंतच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण त्याने जपला आणि त्याचा आनंद लुटला.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
Naga Chaitanya & Sobhita Dhulipala Wedding Nagarjuna Shares Photos
नागा चैतन्य-सोभिता धुलिपाला अडकले विवाहबंधनात! नागार्जुन यांनी सूनबाईसाठी लिहिली खास पोस्ट

अनंत अंबानीने केला भांगडा (Anant Ambani Wedding Dance)

प्री-वेडिंग म्हणजे लग्नाआधीच्या विधी ते लग्नापर्यंत अनंत प्रत्येक कार्यक्रम, विधी अगदी चोखपणे पार पाडताना दिसला. लग्नाआधी जेव्हा अंबानी कुटुंबातर्फे वरात निघाली होती तेव्हा किंग खान शाहरुख, भाईजान सलमान खान, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, माधुरी दीक्षित, दाक्षिणात्य तारा रजनीकांत, क्रिती सेनॉन, आलिया भट्ट, जिनिलिया, रितेश देशमुख असे अनेक कलाकार वरातीमध्ये एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्स करताना दिसले. अनंतदेखील वरातीमध्ये भांगडा करताना दिसला.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: “चोली के पिछे क्या है…”, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात माधुरी दिक्षितच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

अनंतने (Anant Ambani Wedding) वरातीसाठी सोनेरी शेरवानी घातला होता आणि त्यावर लाल रंगाचा फेटा घातल्याने नवरदेव अगदी शोभून दिसत होता. सोल्जर चित्रपटातील ‘नय्यो नय्यो’ या गाण्यावर अनंत थिरकताना दिसला. विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून अनंतचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘दुल्हे राजा अनंत अंबानी’ अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. अंबानी कुटुंबाची सून राधिकादेखील पती अनंतबरोबर ठेका धरताना दिसली.

१२ जुलैच्या रात्री अनंत आणि राधिकाने एकमेकांना वरमाला घातली. दोघेही अगदी आनंदात दिसत होते. अनंत व राधिका हे दोघेही त्यांचा हा सर्वोत्तम क्षण जपत एकमेकांचा हात पकडून थिरकताना दिसले.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात नीता अंबानींनी केला शाहरुख खानबरोबर भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या लग्नसोहळ्यानंतर पुढील दोन दिवस आणखी दोन समारंभ असतील; ज्यात अनुक्रमे १३ जुलै व १४ जुलै रोजी ‘शुभ आशीर्वाद’ व ‘मंगल उत्सव’ म्हणजेच स्वागत समारंभ यांचा समावेश असणार आहे.

Story img Loader