Gulabi Sadi at Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. अखेर १२ जुलै रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. बॉलीवूडसह क्रीडा क्षेत्रातील मंडळी तसेच जगप्रसिद्ध कलाकार अंबानी कुटुंबाच्या या भव्य लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

आपल्या सुरेल आवाजाने अनेक गायकांनी या सोहळ्याची शोभा वाढवली. भारतीय रॅपर किंग, जगप्रसिद्ध गायक रेमा तसेच लुईस फोन्सी यांनी त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने पाहुण्यांचं मनोरंजन केलं. तर या लग्नसोहळ्यात ‘गुलाबी साडी’ फेम संजु राठोडने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत -राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी निघताना किम कार्दशियनच्या बहिणीचा घसरला पाय; Video Viral

काही महिन्यांपासून ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे आणि तुफान व्हायरल होतंय. इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकारांनी यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केले आहेत. हे गाणं व्हायरल झाल्याने संजू राठोडला प्रसिद्ध मिळाली. अनेक प्रसिद्ध कार्यक्रमांना त्याला गाणं सादर करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. आता संजूने थेट अंबानींच्या लग्नसोहळ्यात त्याचं लोकप्रिय गाणं परफॉर्म केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अनंत-राधिकाच्या लग्नात संजू राठोडचा परफॉर्मन्स (Gulabi Sadi at Anant Ambani Wedding)

5262.studios या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सुरू होताच प्रसिद्ध रॅपर किंग हा घोषणा करतो की, “तुम्ही गुलाबी साडीसाठी तयार आहात का?” तेवढ्यात संजू स्टेजवर येतो आणि गुलाबी साडी या गाण्यावर जबरदस्त परफॉर्म करतो. संजू राठोडने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

संजूचा हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, मराठी गाण्यावर सर्वांना नाचवलंस, मानलं भावा तुला. तर दुसऱ्याने, “जस्टीन बीबरपेक्षा तरी चांगलं गायलायस” अशी कमेंट केली आहे; तर अनेकांनी तुझा खूप अभिमान वाटतो अशी कमेंट केली आहे. या व्हिडीओत संजू गात असताना काहीजण त्याच्याबरोबर डान्स करण्यासाठी स्टेजवर येताना दिसतायत.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: “चोली के पिछे क्या है…”, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात माधुरी दिक्षितच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका (Anant Ambani Wedding) मर्चंटच्या शाही लग्नसोहळ्यानंतर काल १३ जुलै रोजी ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा पार पडला. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शविली होती; तर आज १४ जुलै रोजी ‘मंगल उत्सव’ म्हणजेच रिसेप्शन पार पडणार आहे.

Story img Loader