Anant Ambani Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट नुकतेच लग्नबंधनात अडकले. या शाही लग्नसोहळ्याला भारतासह जगभरातील प्रसिद्ध कलाकारांनी आणि बड्या मंडळींनी उपस्थिती दर्शविली होती. किम कार्दशियन, ख्लोई कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल प्रसिद्ध रेसलर आणि अभिनेता जॉन सिना, गायक रेमा अशा अनेक मंडळींनी अनंत-राधिकाच्या या भव्य लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या (Anant Ambani Wedding) शाही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. यात कार्दशियन बहि‍णींच्या पारंपारिक लूकची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा… Anant Ambani Wedding: “चोली के पिछे क्या है…”, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात माधुरी दिक्षितच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी किमने लाल रंगाची डिझायनर साडी नेसली होती. इंडो-वेस्टर्न लूक करत किमने त्यावर मॅचिंग डिपनेक ब्लाऊज घातलं होतं. मिनिमल मेकअप, खुले केस, डायमंड ज्वेलरी यात किम अगदी बोल्ड अ‍ॅंड ब्यूटिफूल दिसत होती. तर या लग्नासाठी ख्लोई कार्दशियनने सोनेरी रंगीची साडी नेसली होती. त्यावर ऑफ शोल्डर फुल स्लीव्हजच ब्लाऊज तिने घातलं होतं.

अनंत-राधिकाच्या या भव्य लग्नसोहळ्यानंतर आज १३ ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठीदेखील किम आणि ख्लोई हजर राहिल्या आहेत. किमने शुभार्शिवाद सोहळ्यासाठी सिल्वर वर्क असलेला फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे. या लेहेंग्यावर किमने डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे. किमच्या मोठ्या नथनीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तर ख्लोई हॉट पिंक म्हणजेच गुलाबी रंगाच्या लेहेंग्यावर दिसली. या लूकने किम आणि ख्लोई हटके दिसत असल्या तरी दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात केला भांगडा; लग्न लागताच पत्नी राधिकासह केला ‘अशाप्रकारे’ आनंद व्यक्त

किम कार्दशियन आणि ख्लोई कार्दशियनचा व्हायरल व्हिडीओ (Kim and Khloe Kardashian Viral Video)

व्हायरल झालेल्या व्हिडीओत कार्दशियन बहि‍णी ताज हॉटेलमधून सोहळ्यासाठी जाण्यास बाहेर पडताना दिसतायत. तेवढ्यात ख्लोईचा पाय घसरतो आणि ती पडता पडता वाचते. “किम कार्दशियनची लहान बहिण पडता पडता वाचली” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं गेलंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा काल १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. आजपासून अनंत-राधिकाच्या लग्नानंतरच्या सोहळ्यांना सुरूवात झाली आहे. आजचा सोहळा पार पडल्यानंतर उद्या १४ जुलै रोजी ‘मंगल उत्सव’ म्हणजेच रिसेप्शन असणार आहे.

Story img Loader