Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नसोहळ्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे. हा विवाहसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शनमध्ये पार पडणार आहे. यासाठी देश-विदेशातून पाहुणे मंडळी भारतात दाखल झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर तो क्षण आज आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अँटालियावर थाटामाटात सेलिब्रेशन करून शुक्रवारी (१२ जुलै) सायंकाळी अंबानी कुटुंबीय बीकेसीच्या दिशेने रवाना झाले. याठिकाणी लग्न मंडपात अंबानी कुटुंबीयांनी एकत्र रॉयल एन्ट्री घेतली. ईशा अंबानी, तिचे पती आनंद पिरामल, नीता व मुकेश अंबानी, अंबानींची मोठी सून श्लोका मेहता, ज्येष्ठ पुत्र आकाश अंबानी व नवरदेव अनंत हे सगळे एकमेकांचा हात धरून पापाराझींसमोर पोज देत होते. यावेळी वरमाई नीता अंबानींनी गुजराती परंपरेनुसार हातात दिवा धरला होता. पारंपरिक लूकमध्ये त्या फारच सुंदर दिसत होत्या. लेकाच्या लग्नात त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नीता अंबानींनी लग्नमंडपात येताच सर्वांची प्रेमाने विचारपूस केली.

हेही वाचा : Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नासाठी जॉन सीनाचा खास भारतीय पारंपरिक लूक, पाहा व्हिडीओ

अंबानी कुटुंबीयांनी लग्नमंडपात एकत्र एन्ट्री घेतल्याने यांच्यामधलं सुंदर असं बॉण्डिंग सर्वांना पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ फिल्मीग्यान या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. बॉलीवूड कलाकारांपासून ते राजकीय क्षेत्रातील मान्यवर या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.

अनंत – राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना खास वाराणसीच्या संस्कृतीचं तेथील ऐतिहासिक वारसा, भारतीय परंपरा याचं दर्शन घडणार आहे. अनंत व राधिका यांच्या लग्नाआधी प्रार्थना करण्यासाठी नीता अंबानी काही दिवसांपूर्वी काशीला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी लग्नासोहळ्यात बनारसी पदार्थांचा मेन्यू असेल असं सांगितलं होतं.

हेही वाचा : Anant-Radhika Wedding: लग्नात फक्त एक गाणं गाण्यासाठी ‘Baby Calm Down’ फेम गायकाचे मानधन तब्बल…

दरम्यान, अनंत – राधिकाचा साखरपुडा २०२३ मध्ये पार पडला होता. यानंतर यावर्षी मार्च महिन्यात दोघांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. या जोडप्याच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचं इटलीत क्रुझवर आयोजन करण्यात आलं होतं. आज शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. तसेच रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल असे अनेक मान्यवर मुंबईत आले आहेत. 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani wedding family enter together at wedding venue nita ambani looks beautiful watch video sva 00