गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सर्वत्र चर्चा होती. तर नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी आघाडीचे हॉलिवूड स्टार्सही हजर होते. तर मनोरंजन विश्वा बरोबरच इतर अनेक क्षेत्रातली दिग्गज मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती. तर त्यांच्याबरोबरच अंबानी कुटुंबियांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंट हिच्याबरोबर या कार्यक्रमात हजर होता. त्याने फोटोग्राफर्ससमोर तिच्याबरोबर अनेक पोज दिल्या. या कार्यक्रमाला त्यांचा लूक खूप चर्चेत आला. तर यावेळी त्याने परिधान केलेल्या घड्याळाची किंमत आता समोर आली आहे.

आणखी वाचा : अंबानींचा शाही थाट! कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण अन् मेन्यूही होता खास

या उद्घाटन सोहळ्याला अनंत अंबानीचा रॉयल अंदाज सर्वांना दिसला. या कार्यक्रमाला त्याने एक महागडं घडयाळ परिधान केलं होतं. Grandmaster Chime या जगातल्या सर्वात आघाडीच्या घड्याळाच्या ब्रँडचं हे घड्याळ होतं. हे घड्याळ जगातलं सर्वात किचकट घड्याळ आहे. या घड्याळात ६ पेटंट असलेली फीचर्स आहेत. तर या घड्याळाला २ वेगळ्या डायल्स आहेत.

हेही वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल आवाक्

या घड्याळाची डायल सोन्याची आहेत, तर या घड्याळात मगरीचं चामडं वापरलं गेलेलं आहे.हे घड्याळ बनवायला १ लाख तास लागले आहेत. या त्याच्या महागड्या घड्याळाची किंमत तब्बल १२ कोटी आहे. अनंतने परिधान केलेल्या या घड्याळाची किंमत समोर येताच सर्वांचेच डोळे पांढरे पडले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani wore luxurious watch worth rs 12 crore at nmacc event rnv