बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच अनन्याने काही फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. अनन्याचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी तिची तुलना ही बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेदशी करत आहेत. तिने काही दिवसांपूर्वी असाच एक ड्रेस परिधान केला होता.
अनन्याने तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्याने पांढऱ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. त्यासोबत तिने पांढऱ्या रंगाच एक परिधान केलं आहे. हे फोटो शेअर करत अनन्याने शेवटी सफरचंदाचा जाळीतला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मला याची जाणीव आहे की त्या जाळीत मी एका फळासारखी दिसत आहे. अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक
आणखी वाचा : सुशांत सिंह राजपुतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त म्हणाले…

आणखी वाचा : अच्छे दिन चले गये ; अमिताभ यांची ही पोस्ट पाहता नेटकरी म्हणाले मोदी…
अनन्यायचे हे व्हायरल झालेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “ताई मासे पकडण्याचं जाळं वाटतयं.” दुसरा नेटकरी म्हणाला, “असं वाटतयं स्पायडर मॅनला भेटली होतीस.” तिसरा नेटकरी म्हणाला, “माझं व्हॉलिबॉलचं नेट परत दे मला.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हिने परिधान केलं तर तिची स्तुती होते आणि उर्फीने परिधान केलं तर तिला ट्रोल करण्यात येत.. कसे आहेत हे लोक,” असे अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.