बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. कधी लग्न तर कधी घटस्फोटच्या चर्चा. तसचं कधी अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चांमुळे सेलिब्रिटी चर्चेत राहतात. चाहत्यांनादेखील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. सध्या चर्चेत आहे ती म्हणजे अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे. अनन्या सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

अनन्या पांडे लवकरच अभिनेता विजय देवरकोंडासह ‘लायगर’ या सिनेमात झळकणार आहे. मात्र अनन्या सध्या तिच्या सिनेमामुळे नव्हे तर तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अनन्या आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरमध्ये जवळीक वाढल्याचं सध्या बोललं जातंय. गेल्या एक दोन वर्षात अनन्या आणि इशान खट्टर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र इशान आणि अनन्या यांच्यात बिनसलं असून दोघांच ब्रेकअप झाल्याचं वृत्त आहे.

आणखी वाचा: अथिया- केएल राहुलचं ठरलं! कधी आणि कुठे पार पडणार सुनील शेट्टीच्या लेकीचा शाही विवाहसोहळा?

‘खाली पीली’ सिनेमाच्या सेटवर ईशान खट्टर आणि अनन्याची ओळख झाली होती. त्यानंतर तीन वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. एप्रिलमध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. तर ईटाईम्सच्या वृत्तानुसार अनन्या आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात जवळीक वाढत चालली आहे. दोघांना फारसं एकत्र स्पॉट करण्यात आलं नसलं तरी दोघांमधील मैत्री वाढल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हे देखील वाचा: “ज्या चित्रपटात धोतर नेसावं लागेल…” ऋषी कपूर यांनी रणबीरला दिला होता सल्ला

दरम्यान, अनन्याच्या लायगर सिनेमातील गाणं नुकतच प्रदर्शित झालंय. तर आदित्य ‘राष्ट्र कवच ओम’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.