अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्कं करत आहे. आतापर्यंत तिने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. पण चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे अनन्याचं नाव बरेचदा चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे आणि इशान खट्टर यांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आता अनन्याचं नाव प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूरशी जोडलं जात आहे.
आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अनन्या कपूर इशान खट्टरशी ब्रेकअप झाल्यानंतर आता अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. ‘ई-टाइम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी नातं आहे. मात्र दोघांनीही याबाबत गुप्तता बाळगली आहे. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या वृत्ताची पुष्टी मात्र त्यांनी अद्याप केलेली नाही.
आणखी वाचा-“मला ब्रेस्ट सर्जरी करण्यास सांगितलं होतं” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अनन्या पांडे याआधी अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरला डेट करत होती. दोघंही जवळपास ३ वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २०२० मध्ये दोघांचा चित्रपट ‘खली पीली’ प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटानंतर दोघांमध्ये दुरावा आला. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघड वक्तव्य केलं नव्हतं मात्र अनेकदा दोघंही सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा झाली होती.