दिग्दर्शक, निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. अनन्या तिला आवड असलेल्या बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल नेहमीच बोलत असते. आता तर तिने तिचा क्रश असलेल्या अभिनेत्याचे बिनधास्तपणे नाव घेतले असून प्रणय दृश्यासाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार हे देखील सांगितले आहे. परंतु याआधी झालेल्या एका मुलाखतीमध्ये अनन्याने कार्तिक आर्यन तिचा क्रश असल्याचा खुलासा अनन्याने केला होता.
अनन्याने नुकताच एका वाहिनीला मुलाखत दिली आहे. दरम्यान अनन्याला तिचा क्रश कोण आणि प्रणय दृश्यासाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार असा प्रश्न विचारण्यात आले होते. ‘कार्तिक आर्यन माझा क्रश आहे हे मी या आधीही सांगितले होते पण माझे आणखीही क्रश आहेत’ असे तिने उत्तर दिले. पुढे अनन्या तिला वरुण धवनसह प्रणय दृश्य करायला आवडेल असेही सांगितले.
त्यानंतर अनन्याला कार्तिक आणि ईशान खट्टर या दोन अभिनेत्यांपैकी कोणासह डेटवर जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘मला कार्तिकसह डेटवर जायला आवडेल’ असे अनन्या म्हणाली.
करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आता अनन्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अनन्यासह कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री भूमि पेडणेकर देखील दिसणार आहे.