बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटाची मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्या आणि विजय मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं संपूर्ण देशभरात जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकतेच हे दोघंही प्रमोशनसाठी हैदराबाद येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी विजय देवरकोंडांच्या घरी पुजा देखील केली. विजयच्या आईने या पुजेचं आयोजन केलं होतं.

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्रमावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती सहकलाकार विजय देवरकोंडासह पुजा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये या दोघांसोबत विजयची आईदेखील दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अनन्याने लिहिलं, “विजयच्या आईचे आशीर्वाद घेतले. त्याच्या घरी पुजाही केली. धन्यवाद आंटी.”
आणखी वाचा- मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात, फोटो शेअर करत म्हणाली “माझ्या आयुष्यातील…”

अनन्या पांडेनं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये अनन्या आणि विजयनं रक्षासूत्रही बांधलेलं दिसत आहे. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. चाहते या दोघांच्या जोडीला खूप प्रेम देताना दिसत आहे. अनन्याने शेअर केलेले हे फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी हे दोघंही प्रमोशनसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत.

आणखी वाचा-Video : तेलंगणातील ‘लायगर’ प्रमोशनला तेलुगू बोलताना अनन्या पांडे अडखळली अन्…

दरम्यान अनन्या आणि विजय देवरकोंडा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लायगर’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे.