बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटाची मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्या आणि विजय मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं संपूर्ण देशभरात जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकतंच हे दोघंही प्रमोशनसाठी तेलंगणाला पोहोचले होते. या वेळी अनन्याने तिथल्या तेलुगू चाहत्यांशी त्यांच्याच भाषेतून संवाद साधला. यावर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई आणि हैदराबादमधील प्रमोशन इव्हेंट आटोपून ‘लायगर’ची टीम तेलंगणाच्या वारंगल येथे पोहोचली होती. यावेळी अनन्या आणि विजय यांच्यासह चित्रपटाची सह-निर्माती चार्मी कौरही उपस्थित होती. या इव्हेंटमध्ये अनन्या पांडेनं तेलुगूमधून स्वतःची ओळख करून दिली. तेलुगू बोलत असताना काही शब्दांनंतर ती अडखळली. पण यावेळी विजयनं तिला सांभाळून घेत ती बरोबर बोलत आहे असा इशारा केला. हा क्षण कॅमऱ्यात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा- “आता यांना धडा शिकवायलाच हवा…” बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूर भडकला

अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, “वारंगलमध्ये माझं तेलुगू भाषण. मी माझ्याकडून माझं प्रेम तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. तुम्ही मला जे प्रेम दिलं तेच प्रेम तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. मला आशा आहे की तुम्हालाही हे जाणवलं असेलच.”

आणखी वाचा- Photos : अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचं लायगर चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हटके फोटोशूट

दरम्यान अनन्या आणि विजय देवरकोंडा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लायगर’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya panday talk in telegu at liger promotion event video goes viral mrj