बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या ‘लायगर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. प्रमोशनसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करताना ते दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या आणि विजयने मुंबईच्या लोकलमधून देखील प्रवास केला होता. आता ते दोघे चित्रपटातील नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी थेट चंदीगढला पोहोचले आहेत. तिने या फोटोला खास कॅप्शन दिले आहे.
‘कोका २.०’ हे ‘लायगर’ चित्रपटातील नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी अनन्या आणि विजय देवरकोंडा यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील सीन रिक्रिएट केला. मुंबई लोकलमधून प्रवास, बीचवरील फोटोशूट यानंतर आता अनन्या आणि विजय यांनी थेट पंजाबमधील शेतांमध्ये ट्रॅक्टरमधून चित्रपटातील नव्या गाण्याचे प्रमोशन केले.
आणखी वाचा – Koffee with Karan 7 नंतर विजय देवरकोंडा आहे करण जोहरवर नाराज? नेमकं काय आहे सत्य
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट शाहरुख खान आणि काजोल यांच्यावर चित्रित झालेला आयकॉनिक चित्रपट आहे. या चित्रपटामधील सीन अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी रिक्रिएट केला. याचे फोटो अनन्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोसोबत ‘प्यार होता है दिवाना सनम #DDLJmoment’ असे कॅप्शन तिने दिले आहे. यातील एका फोटोत विजय आणि अनन्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले दिसत आहेत. अनन्या आणि विजयचे हे हटके प्रमोशन त्यांच्या चाहत्यांना आवडले आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – “प्रमोशन संपल्यानंतर चप्पल…” व्हायरल व्हिडीओमुळे विजय देवरकोंडा होतोय ट्रोल
‘लायगर’ या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पुरी जगन्नाथ हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट ‘पॅन इंडिया’ प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगु, कन्नडा आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच अनन्याचा ‘खो गये हम कहा’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.