प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २२ जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टीझरही झळकले आहेत. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे.
आणखी वाचा : ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने सोशल मीडियाचा घेतला निरोप, पोस्ट शेअर करत म्हणाला…
एम. कॅाममध्ये गोल्ड मेडल पटकावलेली अनन्याचा स्वतःची काही स्वप्नं आहेत, आयुष्यात काही ध्येय आहेत. तिला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. आयुष्याकडे सकारात्कतेने बघणाऱ्या अनन्याचा तिच्या नावाप्रमाणेच अनन्यसाधारण असा प्रवास यात दिसत आहे.
आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…
दिग्दर्शक प्रताप फड या विषयी म्हणाले की, “यापूर्वी ‘अनन्या’ रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. मात्र चित्रपट करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नाटक पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे, एक वेगळा वयोगट आहे. तर तरूणाई चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित होते. ‘अनन्या’ हा असा विषय आहे. जो कधीही जुना होणार नाही आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा चित्रपट आहे. चित्रपट करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे नाटक करताना काही मर्यादा येतात. चित्रपट करताना बरीच मुभा असते. त्यात भव्यता आणू शकता. या ‘अनन्या’लाही प्रेक्षक तसेच भरभरून प्रेम देतील. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट अतिशय भव्य स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय.’’
आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम
प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शक प्रताप फड यांनी केले आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.