पत्रकार परिषद कोणतीही असो, प्रसारमाध्यमांना काहीतरी खमंग, चमचमीत खाद्य हवे असते. म्हणून तर ‘विषयांतर करणारा’ प्रश्न करून एखादी ‘बातमी’ मिळवायचा प्रयत्न होतो, पण एखाद्या कलाकाराला याचीही जाणीव असल्याने तो ‘गप्प’ राहिला तर? केसासासाठीच्या तेलाची एका उत्पादनाची कैतरिना कैफ ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर झाली त्या पत्रकार परिषदेत तेच घडले.
त्या तेलाच्या वापराबाबत व कैतरिनाला केसाची ठेवण कशी आवडते याबाबतचे काही प्रश्न होताच एक ‘विषयांतर’ करणारा प्रश्न आला,तू व रणवीर कपूरमधला रुसवा दूर करण्यासाठी आमिर खानच्या पत्नीने पार्टी ठेवली हे खरे आहे का? प्रश्न अपेक्षित होता की, अनपेक्षित हे आपल्या ‘मुद्रे’वरून लपविण्यात कैतरिना यशस्वी ठरली. (खरं तर तिच्या मुद्रेवर कोणतेच ‘भाव’ उमटत नाहीत, पण जे दिसते त्याबाबत बोला का?) ती काही बोलणार न बोलणार तोच निवेदन समीर कोचरने कॅटची बाजू घेत म्हटलं, या प्रश्नासाठी ही पत्रकार परिषद नाही.. इतकं असूनही सगळं संपता संपतादेखील त्या स्वरूपाच्या प्रश्नाचा मारा होत होता, पण हुशार कैतरिना ते कशाला हो ऐकतेय?

Story img Loader