गेल्यावर्षी मे महिन्यात कोणताही गाजावाजा न करता अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदीनं आपला विवाहसोहळा उरकला. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकेपर्यंत अनेकांना या लग्नाबद्दल खबरही नव्हती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच नेहा गर्भवती असल्याची बातमी सांगत अंगदनं सर्वांनाच आणखी एक धक्का दिला. नेहा लग्नाआधीच गर्भवती असल्यानं हा विवाहसोहळा तडकाफडकी करण्याचा निर्णय घेण्यात आला हे नंतर उघड झालं. आता या जोडप्याला मेहर नावाची गोड मुलगी देखील आहे.

‘मात्र नेहा गर्भवती असल्यापासून लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. अनेकजण चांगलं आणि वाईट बोलणारे दररोज मिळत असतात पण शेवटी कुछ तो लोग कहेंगे म्हणत आम्ही दोघांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं असंही अंगद म्हणाला. या देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे त्यामुळे लोक आपले चांगले -वाईट विचार मांडत असतात. पण मी दोन्ही गोष्टींपासून लांब आणि तटस्थ राहण्याचा प्रयत्न करतो कारण वाईट प्रतिक्रियांमुळे मला माझ्यावर परिणाम करून घ्यायचा नसतो’ असंही अंगद म्हणाला.

काही महिन्यापूर्वी ‘नो फिल्टर नेहा’ कार्यक्रमातच अंगदनं नेहा लग्नापूर्वी गर्भवती असल्याचं कबुल केलं होतं. नेहा लग्नाआधी गर्भवती होती, त्यामुळे ही गोष्ट कुटुंबीयांना कशी सांगायची हा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला होता. कुटुंबींयाना सांगण्याची हिंमतच होत नव्हती. मात्र पहिल्यांदा जेव्हा गोष्ट कुटुंबीयांना सांगितली तेव्हा खूप ओरडा पडला. कुटुंबीयांना ही गोष्ट पचवणं खूपच अवघड गेली, मात्र नंतर दोन्ही परिवारानं आमचं नातं मान्य केलं असं त्यानं मुलाखतीत सांगितलं. तर गर्भवती असल्याची गोष्ट सहाव्या महिन्यापर्यंत मी लपवून ठेवली होती. कदाचित मी गर्भवती असल्याचं समजताच मला कोणीही काम देणार नाही माझ्याबद्दल चुकीचं मत बनवतील अशी भीती मला सारखी वाटायची म्हणूनच मी बातमी लपवून ठेवली होती असं तिनं कबुल केलं होतं.

Story img Loader