शस्त्रक्रिया करून आपले दोन्ही स्तन काढून टाकणारी हॉलिवूड अभिनेत्री एंजेलीना जोली एक चिवट आणि धीट महिला असल्याचे एंजेलीनाचा पार्टनर अभिनेता ब्रैड पिटने  म्हटले आहे. ई ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार एंजेलीनाने शस्त्रक्रियेचे वृत्त सार्वजनीक करण्याच्या निर्णयाचे ब्रॅडला जरा सुध्दा नवल वाटले नाही.
ब्रैड पिट म्हाणाला की, तिच्या या स्वभावामुळेच मला ती पहिल्यापासून आवडते. तुम्ही जी एंजेलीना आज पहात अहात तिला मी नेहमीच बघत आलो असून ती खूप चिवट सुध्दा आहे. ती सर्वप्रकारच्या समस्यांचा यशस्वीपणे सामना करू शकते.
स्तनांच्या शस्त्रक्रियेचे वृत्त सार्वजनीक रित्या जाहिर केल्यापासून ब्रैड पिटच्या ‘वर्ल्ड वॉर झेड’ या चित्रपटाच्या प्रिमियरच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच सार्वजनिकपणे उपस्थित राहिलेली पहाण्यात आली.
एंजेलीनाने स्तनांच्या कर्करोग लागणापासूनचा धोका कमी करण्यासाठी गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया करून दोन्ही स्तन काढून टाकले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा