हॉलिवूडचे हॉट कपल ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली सरते शेवटी फ्रान्समध्ये एका खासगी समारंभात गुपचुप लग्नबंधनामध्ये अडकले. नुकतेच त्यांनी या लग्नसोहळ्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. अटेलियर वर्साचेच्या लुगी मास्सीने डिझाईन केलेला आयव्हरी रंगाचा वेडिंग ड्रेस परिधान केलेली अँजेलिना खचितच सुंदर दिसते.
स्कुप नेकसह पुढच्या बाजूने साधा ठेवण्यात आलेल्या अतिशय मनमोहक अशा या ड्रेसवर मागील बाजूस मडॉक्स, पॅक्स, झारा, शिलो, नॉक्स आणि विविन या अँजेलिना आणि ब्रॅडच्या सहा मुलांनी काढलेल्या चित्रांचे डिझाईन साकारण्यात आले आहे.
Congratulations Angelina Jolie! You look sensational in my creation for your special day! Lots of love, DV pic.twitter.com/l0GafaxsAz
— Versace (@Versace) September 2, 2014
आपल्या लग्नसोहळ्यात मुलांचादेखील सहभाग असावा, अशी या जोडप्याची मनोमन इच्छा होती. १३ वर्षांचा मडॉक्स आणि १० वर्षांचा पॅक्स लग्नाच्या ठिकाणी आई अँजेलिनाला घेऊन आले. तर, नऊ वर्षाची झारा आणि सहा वर्षाची विविन या फ्लॉवर गर्ल होत्या. आठ वर्षाचा शिलो आणि सहा वर्षाचा नॉक्सनेवर लग्नाच्या अंगठ्या सांभाळण्याची आणि त्या लग्नाच्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी होती. लग्नाचा केक पॅक्सने तयार केल्याचे समजते.
‘मि अॅण्ड मिसेस स्मिथ’ चित्रपटाच्या सेटवर ब्रॅड आणि अँजेलिनाची भेट झाली. या आधी ब्रॅडचे जनेफर आईन्स्टनशी लग्न झाले होते, तर अँजलिनाचे पहिल्यांदा जॉनी ली मिलर आणि त्यानंतर बिली बॉब थ्रॉंटॉनशी लग्न झाले होते.