बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेत्री राधिका मदनने आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात राधिका मदनने इरफान खान यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘अंग्रेजी मीडियम’ हाच इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला. इरफान खान यांच्याकडून नेहमीच मला प्रेरणा मिळाली, ते लढवय्ये होते असे राधिक मदनने म्हटले आहे. स्पॉटबॉयईने हे वृत्त दिले आहे.

“नेमकं काय म्हणायचं ते मला समजत नाहीय. हे लिहीत असताना मला मनातून प्रचंड दु:ख होत आहे. मला माहितीय त्याप्रमाणे इरफान खान हा एक खंबीर, लढवय्या माणूस होता.  या आयुष्यात माझी त्यांच्याबरोबर भेट झाली, हे माझं नशीब आहे. ते नेहमीच अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत राहतील. इरफान खान दिग्गज होते. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी बदलून टाकली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो” असे राधिका मदनने म्हटले आहे.

बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार इरफान खान यांचे बुधवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. colon infection मुळे इरफान खान यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान भारतात परतले होते.

Story img Loader