सोनम कपूरच्या आगामी ‘खुबसूरत’चा ट्रेलर प्रदर्शित होऊन २४ तासही उलटले नाही तोवर हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. प्रख्यात दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या १९८० साली प्रदर्शित झालेल्या ‘खुबसूरत’चा हा चित्रपट रिमेक आहे. ‘खुबसूरत’च्या ट्रेलरमध्ये असलेल्या अंजन की सिटी में मारो मन डोले या गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
काही अग्रगण्य दैनिकांनी ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेले गाणे हे अनू मलिक यांनी संगीत दिलेल्या ‘माँ’ चित्रपटातील गाण्याची चोरी असल्याचे मह्टले आहे. त्यावर सोनमने ट्विटरवर तिचा राग व्यक्त करत पत्रकारांची कानउघाडणी केली. ती म्हणाली, मला दया येतेयं की तुम्ही बातमी लिहण्यापूर्वी पूर्ण माहिती नाही काढत. ‘अंजन की सिटी’ हे जुने राजस्थानी पारंपारिक गाणे आहे. जबाबदारीची जाणीव न ठेवता पत्रकार बातमी लिहत आहेत. काही खराब सफरचंद पूर्ण टोपली खराब करतायतं.



सोनमच्या ट्विट नंतर लगेचच गायिका सोना मोहापात्राने ट्विट केले.



ती म्हणाली, ‘अंजन की सीटी मै मारो मन डोले’ हे पारंपारिक राजस्थानी गाणे आहे, ना की अनू मलिकचे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने मूळ राजस्थानी गाण्याचे अधिकार विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ‘खुबसूरत’च्य ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
माँ चित्रपटातील अनू मलिक यांनी संगीत दिलेले ‘अंजन की सीटे मै मारो’ गाणे:

Story img Loader