बहुप्रतिक्षित, बहुचर्चित असा मराठी चित्रपट ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनापूर्वीच त्यातील डायलॉग हिट ठरत आहेत. सोशल मीडियावर याच डायलॉग्जची चर्चा असून मजेशीर मीम्ससुद्धा पाहायला मिळत आहेत. हेच संवाद जर रोजच्या जीवनात वापरले तर काय गंमत होईल, हे एका गमतीशीर व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहा व्हिडिओ-

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांचा उदय आणि अस्त या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे हा काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत दिसणार असून सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मोहन जोशी असे स्टार कलाकार या चित्रपटात दिग्गज कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ani dr kashinath ghanekar marathi movie dialogues in funny way watch this video