कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील छोटे सुरवीर आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकत आहेत. कार्यक्रमातील स्पर्धकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडणार आहे. ‘वायाकॉम18 मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत आगामी चित्रपट ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या टीमने म्हणजेच सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे यांनी कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली.
या कार्यक्रमात चित्रपटाच्या टीमने धमाल किस्से, आठवणी सांगितल्या. हा दिवाळी विशेष भाग येत्या सोमवार ते बुधवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.

दिवाळी विशेष भागात स्पर्धकांनी एकापेक्षा एक गाणी लावून प्रेक्षकांना थक्क केले. मीरा, उत्कर्ष, नेहा केणेने नका सोडून जाऊ, सक्षमने शूर आम्ही सरदार आम्हाला ही गाणी सादर केली. तसेच सुबोधने महेश काळे यांना एक गाणे सादर करण्याची विनंती करताच कार्यक्रमात अजूनच रंगत आली. सोनाली कुलकर्णीनेही दोन ओळी सादर केल्या. तर सुमित राघवनने सईसोबत तेरा मुझसे हे सुंदर गाणे सादर केले.

zee marathi awards akshara and adhipati energetic dance on joru ka ghulam
Video : “मैं जोरू का गुलाम…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर अक्षरा-अधिपतीचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “विषय हार्ड…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Actor Sankarshan Karhade presented a beautiful poem for his mother watch video
Video: “जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा”, संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकून कलाकार झाले भावुक, पाहा व्हिडीओ
aamir khan and suriya working in Ghajini 2
Ghajini 2 : एकच सिनेमा, सारखेच पात्र, पण भूमिका साकारणार दोन अभिनेते; आमिर खान आणि दाक्षिणात्य स्टार ‘गजनी २’मध्ये दिसणार
Paaru
Video : पारू अन् आदित्यचा मराठमोळा अंदाज! दोघांचं प्रेम खुलणार, मालिकेचं नवीन गाणं पाहिलंत का?
History of Bandhani
History of Bandhani: सिंधू संस्कृती ते अजिंठा; पाचहजार वर्षांच्या बांधणी-गाठी उलगडतात तेव्हा!
lakhat ek amcha dada fame nitish Chavan dance in 100 episode completed celebration
Video: १०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या सेटवर कलाकारांचा जल्लोष, नितीश चव्हाणने केला भन्नाट डान्स
Marathi Actor Ajinkya Deo presented a poem in memory of his father Ramesh Deo watch Video
Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ

Video : ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’वरचा हा एकदम कडक व्हिडिओ

या चित्रपटाबद्दल सांगायचे तर तो सुवर्णकाळ तसेच त्या सुवर्ण क्षणांना पुन्हा एकदा बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे, असं सुमीत म्हणाला. चित्रपटातील कलाकार त्यांचे अनुभव, या चित्रपटादरम्यानचा त्यांचा प्रवास प्रेक्षकांना सांगणार आहेत.