हॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अनिकेत विश्वासराव गेली बरीच वर्ष अगदी सहज तरूणींच्या मनाचा ठोका चुकवतोय. मात्र वायकॉम18 मोशन पिक्चर्सच्या ‘पोश्टर गर्ल’मधून एक वेगळाच अनिकेत आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. नेहमीच बिनधास्त, बेधडक वाटणारा अनिकेत पोश्टर गर्लमध्ये तरूणींपासून लांब पळताना दिसतोय. आणि असाच पळता पळता तो धडकला आहे ‘पोश्टर गर्ल’ला. पोश्टर गर्लमध्ये अनिकेतने ‘बजरंग दुधभाते’ साकारला आहे. व्यायाम करून चांगले शरीरसौष्ठव कमवणे येवढाच काय तो त्याच्या ध्यासामुळे शेतकरी असणाऱ्या या बजरंगरावांनी आता फक्त व्यायामाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
पोश्टर गर्लच्या काकांनी तिच्या स्वयंवरासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी हे आपले दुसरे उमेदवार. कॉलेजमध्ये मुली असतात म्हणून शिक्षण अर्धवट सोडणारे बजरंगराव पोश्टर गर्लसाठी काय काय करतात हे येत्या १२ फेब्रुवारीला तुम्हाला पाहता येईल.
तरूणींपासून लांब पळतोय अनिकेत विश्वासराव!
हॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
आणखी वाचा
First published on: 18-01-2016 at 13:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aniket vishwasraos character in poshter girl