अनंत अंबानी व राधिका यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी सोमवारी (८ जुलैला) अनंत व राधिकाचा हळदी समारंभ झाला. या समारंभाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच अंबानी कुटुंबाचे नातेवाईक या सोहळ्यात उपस्थित राहिले. अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांच्या कुटुंबाने लक्ष वेधून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल अंबानी, त्यांच्या पत्नी टीना मुनीम व त्यांची सून क्रिशा शाह अंबानी हे अनंत व राधिकाच्या हळदी समारंभाला पोहोचले होते. टीना सुंदर पिवळी साडी नेसून या कार्यक्रमाला पोहोचल्या होत्या. तर त्यांच्या सूनबाईनेही पिवळा ड्रेस या खास दिवसासाठी निवडला होता. हिरव्या रंगाच्या मोत्यांच्या दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला होता. या सासू-सुनेने पापाराझींना पोज दिल्या आणि नंतर त्या अँटिलियामध्ये गेल्या. टीना व क्रिशा यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Video: अनंत अंबानी-राधिका मर्चेंटला हळद लागली! हळदीने माखले मुकेश अंबानींचे व्याही, तर रणवीर सिंह…

अनंत व राधिका यांच्या हळदी समारंभाला सलमान खान, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अनन्या पांडे, गायक राहुल वैद्य, मानुषी छिल्लर, वेदांग रैना, ओरी, खुशी कपूर, बोनी कपूर यांनी हजेरी लावली होती. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर हे सेलिब्रिटी हळदीने माखलेले अँटिलियामधून बाहेर पडताना दिसले. यावेळी टीना मुनीम व अनिल अंबानी देखील हातात हात पकडून हळदीने माखलेले घरी जाण्यास निघाले. दोघांनी पापाराझींना पोज दिल्या. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गरबा नाईट, शिव पूजा ते सात फेरे! १४ जुलैपर्यंत असतील अनंत-राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम, कोणते समारंभ कुठे होणार?

काय करते अनिल अंबानी यांची मोठी सून क्रिशा शाह?

क्रिशा शाह ही अनिल अंबानी व टीना मुनीम यांची मोठी सून आहे. जय अनमोल अंबानी व क्रिशा शाह यांचे लग्न २० फेब्रुवारी २०२२ रोजी झाले होते. क्रिशा शाह अंबानी ही DYSCO नावाची संस्था चालवते. डिस्को हे एक प्रोफेशनल नेटवर्किंग अॅप आहे, जे लोकांना काम, करिअर आणि व्यवसायांचा दृष्टीकोन देण्यासाठी तयार करण्यात आलंय. क्रिशाने कॅलिफोर्निया विद्यापीठातून पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सोशल पॉलिसी आणि डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. आता ती स्वतःचा व्यवसाय सांभाळते. क्रिशा व जय अनमोल यांनी साधेपणाने साखरपुडा केला होता व नंतर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्न केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil ambani wife tina munim with daughter in law at anant radhika haldi what krisha shah do hrc