बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी पडद्यावर फारच हिट ठरली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट प्रचंड गाजला. ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट अनिल कपूर यांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अनिल कपूर आणि बोनी कपूर या दोन्ही भावांचे फार मोठे भांडण झाले होते. या भांडणाचे कारण श्रीदेवी होत्या असे बोललं जातं.
‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटादरम्यान घडलेले अनेक किस्से आजही चर्चेत असतात. ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटादरम्यान अनिल कपूरचे त्याचा भाऊ आणि निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत जबरदस्त भांडण झाले होते. या दोन भावांच्या भांडणाचे कारण श्रीदेवी असल्याचे बोललं जाते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनिल कपूर आपला भाऊ बोनीवर इतका नाराज झाला की त्याने चित्रीकरण अर्धवट सोडले होते.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, बोनी कपूर हे ‘मिस्टर इंडिया’च्या निर्मितीमध्ये व्यस्त होते. बोनी कपूर यांना या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत श्रीदेवीला पाहायचे होते. पण श्रीदेवीने त्यांची ऑफर फेटाळून लावली होती. यानंतर या चित्रपटात काम करण्यासाठी श्रीदेवीने फी म्हणून तब्बल १० लाख रुपयांची मागणी केली होती. पण बोनी कपूर यांनी तिला १० ऐवजी ११ लाख रुपये दिले.
अनिल कपूरला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो चांगलाच संतापला. विशेष म्हणजे अनिल कपूरने स्वतः या चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप पैशांची गुंतवणूक केली होती. त्यामुळेच तो कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक खर्चाबाबत फारच काळजी घेत होता. पण जेव्हा अनिल कपूरला श्रीदेवीच्या फी बद्दल समजले, तेव्हा त्याला खूप राग आला.
‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटादरम्यान श्रीदेवी अभिनेता मिथुन चक्रवर्तीला डेट करत होती. त्यांच्या अफेअरच्या चर्चा फारच रंगल्या होत्या. मात्र या चित्रपटाच्या काळात त्या दोघांचे नाते तुटले. तर दुसरीकडे श्रीदेवी ही आर्थिकदृष्ट्या फार कमकुवत झाली होत्या. श्रीदेवी यांच्या आईची तब्येत फार बिघडली होती. आईच्या उपचारासाठी श्रीदेवी सर्व पैसे खर्च करत होती. ही गोष्ट बोनी कपूर यांना कळताच त्यांनी तिच्या आईच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. तसेच श्रीदेवी आणि तिच्या आईला उपचारासाठी अमेरिकेला जाण्यासाठी तिकीटही बुक केले. अनिल कपूर याला याबाबतची माहिती मिळताच तो यावर चांगलास संतापला. यानंतर अनिल कपूरने ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातून काढता पाय घेतला.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच अडकणार विवाहबंधनात? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी अनिल कपूर यांची समजूत घातली. त्यानंतर अनिल कपूर चित्रपटात परतण्यासाठी एक अट घातली आणि निर्मितीचे काम हाती घेतले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने या नफ्यातील मोठा हिस्साही स्वत:च्या नावे केला होता. श्रीदेवी यांना हे सर्व कळताच तिने बोनी कपूर यांच्याशी ८ महिने बोलणं बंद केले होते.