बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा जुना व्हिडीओ चर्चेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डांसर वर्तिक झा मिस्टर इंडिया चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘आय लव्ह यू’वर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी डान्स केला होता. वर्तिकाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर ती अनिल कपूर यांना तिच्यासोबत डान्स करण्याची विनंती करते. त्यांच्या या डान्सचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये अनिल कपूर आणि वर्तिका डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ‘डांस वर्ल्ड १८’ या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
अनिल कपूर यांनी हमारे तुम्हारे या चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८३ साली वो सात दिन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. आज ते बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात.