बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया ही जोडी तब्बल २७ वर्षांनंतर रूपेरी पडदा एकत्र दिसणार आहे. अनीज बाझ्मीच्या ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात ते काम करत आहेत.
१९८६ साली प्रदर्शित झालेल्या जांबाज या चित्रपटात ही जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता ही जोडी ‘वेलकम बॅक’ मध्ये एकत्र दिसेल. जांबाज चित्रपटातील ‘तेरा साथ है कितना प्यारा’ हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. हेच गाणे आता या जोडीवर ‘वेलकम बॅक’ या चित्रपटातही चित्रीत केले जाणार असल्याची चर्चा आहे.
अनिल कपूर म्हणाला की, डिंपलसोबत काम करून खूप वर्ष झाली. यापूर्वी ‘राम-लखन’ या चित्रपटात आम्ही एकत्र काम केले होते. पण, त्यात ती जॅकी श्रॉफची प्रेमिका होती. डिंपल खूपच उत्कृष्ट अभिनेत्री आहे. डिंपलसोबत पुन्हा एकदा काम करायला मिळत आहे, याचा मला आनंद आहे. मात्र, मधल्या काही वर्षात आपण तिच्या संपर्कात नसल्याची खंत त्याने यावेळी बोलून दाखविली.
‘वेलकम बॅक’ हा सिनेमा २००७ मध्ये आलेल्या वेलकमचा सिक्वल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor dimple kapadia to do a jaanbaaz once again