अमेरिकेतील ‘टम्पा कन्व्हेशन सेंटर’मधील ‘इंटरनॅशनल इंडिया फिल्म अॅकेडमी एक्स्पो’चे बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोद्वारे व्यापर, वस्तू पुरवठा आणि सेवा पुरविणाऱ्या भारतीय आणि अमेरिकन लोकांना एकत्र आणले जाणार आहे. या एक्स्पोद्वारे दोन देशांतील व्यापार आणि वाणिज्य सेवेच्या प्रचारासाठी चांगले व्यासपीठ लाभणार आहे. यावेळी बोलताना अनिल कपूर म्हणाले, या एक्स्पोचे उद्घाटन करून मी धन्य झालो. ही एक चांगली योजना आहे. लोकांशी भेटण्याचा आणि व्यावसायिक देवाणघेवाणीचा निश्चितच हा एक चांगला मार्ग आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर लोकांची उपस्थिती पाहून मला खूप बरे वाटले. एवढे लोक येतील असे मला वाटले नव्हते. टम्पा बेची माणसे खूप प्रेमळ असल्याचेदेखील ते म्हणाले. या एक्स्पोमध्ये कपडे, वधू पोषाख, दागिने, हस्तकलेच्या वस्तू आणि भारतीय खाद्यपदार्थ इत्यादींचे स्टॉल असणार आहेत. अनिल कपूरची एक झलक पाहाण्यासाठी त्याचे अनेक चाहते या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या या आवडत्या अभिनेत्याबरोबर हस्तांदोलन करण्याबरोबरच चाहत्यांनी त्याच्यासोबत छायाचित्रदेखील काढले. अनिल कपूरच्या चाहत्यांनी ‘राम लखन’ या त्याच्या चित्रपटातील ‘वन टू का फोर’ हे प्रसिध्द गाणेदेखील यावेळी गायले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘आयफा एक्स्पो’चे अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते उद्घाटन
अमेरिकेतील 'टम्पा कन्व्हेशन सेंटर'मधील 'इंटरनॅशनल इंडिया फिल्म अॅकेडमी एक्स्पो'चे बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-04-2014 at 08:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor inaugurates iifa expo