आगामी “मनातल्या उन्हात” सिनेमाचा फर्स्ट लूक आणि संगीत प्रकाशन सोहळा बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी या सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्यासोबत अभिनेत्री उषा जाधव आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लावली होती.
“मनातल्या उन्हात” या सिनेमाला शुभेच्छा देत अनिल कपूर म्हणाला की, सिनेमाचा विषय हा वेगळा असून सिनेमातील गाणी आणि त्याचे संगीत उत्तम आहे. अभिनेता कैलास वाघमारे याचा जरी हा पहिला सिनेमा असला तरी पडद्यावर पाहताना तो अगदी सहजपणे वावरताना दिसतोय.
“मनातल्या उन्हात” या सिनेमाची कथा आयएएफ अधिकारी संजय पाटील यांची आहे. या सिनेमात अभिनेते किशोर कदम, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप, बालकलाकार हंसराज जगताप, मंथन पाटील आणि ओवेशिक्षा पाटील यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहता येणार आहेत. आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटीलची पहिली सिनेनिर्मिती असलेला, पांडुरंग जाधवचे दिग्दर्शन असलेला “मनातल्या उन्हात” हा चित्रपट येत्या २४ जुलैला प्रदर्शित होणार आहे
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jun 2015 रोजी प्रकाशित
मनातल्या उन्हातचा अनिल कपूरने केला फर्स्ट लूक लॉन्च
आगामी "मनातल्या उन्हात" सिनेमाचा फर्स्ट लूक आणि संगीत प्रकाशन सोहळा बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

First published on: 23-06-2015 at 02:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor launch music and first look of manatalya unhat