बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर AK vs AK या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याच चित्रपटानिमित्त नुकताच अनिल कपूर यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन मला प्रश्न विचारा मी उत्तर देईन असं सांगत अनिल यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलं. मात्र या सर्वांमध्ये त्यांचं एक उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण एका चाहतीने गुजरातीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनिल कपूर यांनी थेट मराठीत उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> मजनू भाईंचे हे भन्नाट Memes नेटकऱ्यांना कायमच खदखदून हसवतात

युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं. तसेच आपल्या या ५८ सेकंदांच्या व्हिडीओच्या शेवटी तिने अनिल कपूर यांना मला तुम्हाला भेटून तुमची मुलाखत घेण्याची इच्छा आहे असंही म्हटलं. हा व्हिडीओ ट्विट करताना अदितीने तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला.

नक्की वाचा >> अनिल कपूर आणि ‘झकास’ शब्दाचं अनोखं कनेक्शन

अनिल कपूर यांनी या ट्विटला उत्तर देताना व्हिडीओमध्ये अदितीने व्यक्त केलेल्या मुलाखत घेण्यासंदर्भातील इच्छेवर भाष्य केलं. मात्र हे उत्तर देताना गुजराती तसेच इंग्रजीमधून बोलणाऱ्या अदितीला मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिलं. “तुम्ही मला बोलवा मी कधीही येईन” असं उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिलं.

मात्र त्यावर अदितीने मला ही भाषा समजत नाही असं उत्तर दिलं होतं. अनिल कपूर यांच्या मराठी चाहत्यांनी अदिती गुजराती असल्याने ती गुजराती भाषेतून चित्रपटांचे परिक्षण करते. त्यामुळे मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी तिला मराठीत उत्तर दिल्याचं या ट्विटला रिप्लाय करुन म्हटलं आहे.

अनिल कपूर यांनी नक्की मराठीत उत्तर का दिलं हे स्पष्ट झालं नसलं तरी त्यांनी गुजराती प्रश्नाला मराठीत दिलेलं उत्तर हा चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor replied gujarati content creater in marathi scsg
Show comments