बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर त्याच्या होम प्रॉडक्शनतर्फे निर्मिती केल्या जाणा-या ‘सात हिंदुस्तानी’ या आगामी चित्रपटात सात नव्या चेह-यांना संधी देण्याचा विचार करत आहे. या आधी अनिल कपूरने ‘बधाई हो बधाई’, ‘गांधी माय फादर’ आणि ‘आएशा’ सारखे चित्रपट निर्माण केले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सात हिंदुस्तानी’ हा देशभक्तीपर चित्रपट नसून, अमेरिकेत राहणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ही कथा आहे. चित्रपटातील सर्व चेहरे नवीन असून, यातील प्रमुख भूमिकेत सात नवे चेहरे दिसणार आहेत. कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्यांची निवड करण्यात येईल. चित्रपटाचे शुटिंग सप्टेंबर-आक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

Story img Loader