टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अनिता तिचा पती रोहित रेड्डीसोबत बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. मात्र, अनिता खरंच प्रेग्नंट आहे की नाही, याबाबत तिचे चाहते संभ्रमात आहेत. या फोटोसह अनिताने दिलेल्या कॅप्शनची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
अनिता हसनंदानीने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘नाही, मी प्रेग्नंट नाही.’ पण फोटोमध्ये ती तिच्या पतीसोबत तिचा बेबी बंप दाखवत आहे. त्याचवेळी तिच्याजवळ बसलेला तिचा नवरा बेबी बंप आणि अनिताकडे बघून हसताना दिसतोय. काही लोकांच्या मते, अनिताचा फोटो जुना आहे. बिपाशा बसूच्या लेटेस्ट फोटोशूटने प्रभावित होऊन तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा- ‘दगडीचाळ २’ मध्ये आता ‘शकील’ची एंट्री, ‘हा’ अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
शेअर केलेल्या फोटोमध्ये अनिता आणि तिचा पती रोहित यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत. पण दुसरीकडे ते थोडे गोंधळलेलेही आहेत. एका यूजरने लिहिले, ‘व्वा! अभिनंदन.’ काही लोकांनी त्यांच्या भावना हार्ट इमोजीद्वारे व्यक्त केल्या आहेत. तर आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘तू प्रेग्नंट नाहीस तर मग फोटो?’ दुसर्या एका चाहत्याने, ‘मोठा गोंधळ आहे भाऊ..फोटो आणि कॅप्शनमध्ये.’ अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा-विकी कौशलने कतरिनासह सप्तपदी घेण्यासाठी केली होती घाई, लग्नाबाबत केला रंजक खुलासा
अनिता हसनंदानी हिचा विवाह रोहित रेड्डीशी २०१३ साली झाला आहे. रोहित रेड्डी गोव्यातील प्रसिद्ध बिझनेसमन आहे. रिपोर्ट्सनुसार, अनिता-रोहितची पहिली भेट एका जिममध्ये झाली होती. यानंतर ते दोघे एका पबबाहेर भेटले. रोहितने मुलाखतीत सांगितले होते की, अनिताला भेटण्यापूर्वी त्याला तिच्या स्टारडमबद्दल माहिती नव्हती.