छोट्या पडद्यावरील बहुचर्चित पहिल्या ज्युनिअर इंडियन आयडॉल या स्पर्धेच्या किताबाचा मान अंजना पद्मनाभन हीला मिळाला आहे. काल रविवार रात्री ज्युनिअर इंडियन आयडॉल स्पर्धेच्या अंतिम सोहळा पूर्णत्वास आला.
पहिल्या ज्युनिअर इंडियन आयडॉल ठरलेल्या अवघ्या दहा वर्षीय अंजनाला सोनी टेलिव्हिजन तर्फे पंचवीस लाखांचे पारितोषिक, निस्सानची मायक्रा कार तसेच कोटक महेंद्रामध्ये पाच लाखांचे व हॉर्लिक्सकडून दोन लाखांचे मुदत ठेव बक्षिस देऊन सन्मान कऱण्यात आला. भारतातून एकूण ८६ स्पर्धकांचा ज्युनिअर इंडियन आयडॉलमध्ये सहभाग होता. त्यातून अंजनासह चार स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले होते. अखेरीस अंजनाने चाहत्यांची सर्वाधिक मते मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
अंजना म्हणाली, “मंचावर आम्ही एकमेकांचे विरोधी स्पर्धक जरी असलो तरी, आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. कार्यक्रमातील प्रत्येक क्षण त्यातील आनंद, दु:ख हे आमच्या सर्वांचे होते. मी जिंकल्याचा मला नक्की आनंद आहे पण, इतर सर्व स्पर्धकही उत्तम आहेत”
‘अंजना पद्मनाभन’ ज्युनिअर इंडियन आयडॉलची विजेती
छोट्या पडद्यावरील बहुचर्चित पहिल्या ज्युनिअर इंडियन आयडॉल या स्पर्धेच्या किताबाचा मान अंजना पद्मनाभन हीला मिळाला आहे.
First published on: 02-09-2013 at 10:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjana padmanabhan wins first indian idol junior