बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन १४ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांनी लग्नानंतर मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. त्या दोघांनी शाही अंदाजात एण्ट्री केली होती. तर लग्नानंतर अंकिताला पती विकीने मालदीव्हमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकीने अंकिताला लग्नात भेट म्हणून मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. या व्हिलाची किंमत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अंकिताने देखील विकीसाठी एक प्रायव्हेट यॉट भेट म्हणून दिली आहे. या यॉटची किंमत ही ८ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. तर ही यॉट विकीला प्रचंड आवडली असे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट

अंकिता आणि विकीच्या मित्रांनी देखील त्यांना अशाच अनोख्य भेटवस्तू दिल्या आहेत. निर्माती एकता कपूरने अंकिताला ५० लाख रुपयांचा डायमंडचा सेट भेट म्हणून दिला आहे. माही विजने सब्यासाची कलेक्शनमधली १५ लाखांची साडी अंकिताला गिफ्ट केली आहे. ऋत्विक धनजानीने विकीला एक लग्झरी घडी आणि अंकिताला डायमंडचं चोकर भेट म्हणून दिलं आहे. याची किंमत १५ लाख रुपये आहे. टायगर श्रॉफने अंकिताला मिनी कूपर ब्रँडची गाडी गिफ्ट दिली आहे. अभिनेत्री सृष्टि रोडेने अंकिताला सोन्याची चेन गिफ्ट केल्याच्या चर्चा आहेत.

आणखी वाचा : कधी मारहाण, तर कधी शिवीगाळ ; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव

अंकिताला तिचं लग्न गाजाबाज्यात करायचे होते आणि तसेच झाले. विकी आणि अंकिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अंकिता आणि विकी २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. विकी एक व्यावसायिक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande and vicky jain wedding vicky gifts ankita a private villa in maldives worth rs 50 crore dcp