पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर अनेक कलाकार विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अभिनेता सोनू सूदने याप्रकरणी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना आवाहन केले आहे.

अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने चंदिगड विद्यापीठातील घडलेल्या संतापजनक प्रकाराबद्दल भाष्य केले आहे. यात ती म्हणाली, “माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की ज्या कोणाला ५० मुलींचा अंघोळ करतानाचा व्हायरल होणारा खासगी व्हिडीओ मिळाला असेल त्याने तो तातडीने डिलीट करा. हे माझे विनंतीपूर्वक आवाहन आहे. आपल्या घरीही आई, बहिणी आहेत. कृपया हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवा आणि त्यांचा आदर करा.”
आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

ankita lokhande

अंकितासह अनेक कलाकारांनी हा व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती सोशल मीडिया युजर्सला आणि नेटकऱ्यांना केली आहे. तसेच सोनू सूदने ट्वीट करत “चंदीगड विद्यापीठात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या बहि‍णींना साथ देण्याची, त्यांच्या बरोबर उभं राहण्याची हीच वेळ आहे. एक जबाबदार समाज म्हणून आपण उदाहरण निर्माण केलं पाहिजे. ही कठीण प्रसंगाची वेळ केवळ पीडित विद्यार्थिनींसाठी नसून आपल्या सगळ्यांसाठी आहे”, असं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

पंजाबमधील मोहाली या ठिकाणी असणाऱ्या चंडीगड विद्यापीठात विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ शूट करुन ते व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर त्या विद्यापीठातील विद्यार्थिनींनी जोरदार विरोध केला. त्यांनी रविवारी तीव्र आंदोलन करत निदर्शने केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी या विद्यार्थिनींकडून केली जात आहे. याप्रकरणी एका विद्यार्थिनींसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अटक केलेल्या विद्यार्थिनीने हे व्हिडीओ शूट करून ते व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर आहे. अटक केलेल्या विद्यार्थिनीचा मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जवळपास ५५-६० विद्यार्थिनींचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकारानंतर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे.

Story img Loader