अभिनेत्री अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता सध्या पवित्र रिश्ता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मानव ही भूमिका आता शाहीर शेख साकारत आहे. पहिल्या पर्वात अंकिता आणि सुशांतची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अंकिता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अंकिताने नुकतेच एक रील सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे रील पाहून अंकिताचा आणि बॉयफ्रेंड विकी जैनचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अंकिताने हे रील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या रीलमध्ये अंकिताने अनारकली परिधान केला आहे. या रीलमध्ये अंकिता धनुष आणि काजय अग्रवाल यांच्या मारी या चित्रपटातील हिंदी डब्ड डायलॉग ‘भाड़ में गया प्यार व्यार, ये लव वव का कैरेक्टर अपुन को सूट नहीं करता’, वर लिपसिंग करत अभिनय करते. त्यानंतर अंकिता ब्राउन मुंडे या गाण्यावर डान्स करते. तिचे हे रील नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहे.

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

आणखी वाचा : “त्या दिवशी बाळासाहेब नसते तर…”, अमिताभ यांनी केला होता खुलासा

अंकिता आणि विकी जैनचा ब्रेकअप झालेला नाही. तर तिने हे रील मस्ती म्हणून केले आहे. अंकिता आणि विकी लवकरच लग्न करतील अशा चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताने विकी जैनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत अंकिताने विकीला सगळ्यात चांगला बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले होते.