लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे अखेर विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईत राजेशाही थाटात अंकिता-विकीचा लग्नसोहळा पार पडला. दरम्यान लग्नाच्या धामधुमीत अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला वॉकरची मदत घ्यावी लागली होती. पण एवढे असतानाही ती डान्स करणे सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच अंकिताची खास मैत्रिण आशिता धवन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ अंकिता लोखंडे अभिनेता आमिर खानच्या ‘परदेशी परदेशी जाना नही’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच यावेळी ती मोठमोठ्याने गाणेही गात असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी ती हातात वॉकर घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या पायाला दुखापत झाल्याने तिने नीकॅपही लावल्याचे दिसत आहे. एवढं झाल्यानंतरही ती डान्स करणे काही सोडत नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान अंकिताने हा व्हिडीओ शेअर करताना आशिताने हटके कॅप्शनही दिले आहे. “मिसेस जैन, लव्ह युअर स्पिरिट. नवीन वर्षाची सुरुवात उडी मारुन करा,” असा सल्ला तिने दिला आहे. तर अंकिताने हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. “पाय मोडला पण हिंमत हरली नाही, नववधूच्या हिंमतीची खरच दाद दिली पाहिजे,” असेही तिने म्हटले आहे.

खास साडी परिधान करत अंकिता लोखंडेने साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, साडीची किंमत माहितीये का?

दरम्यान तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. पायाला दुखापत झाल्यानंतर तिने आधीच लग्नात डान्स केला आहे. मग आता इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग का? असा प्रश्न एका नेटकऱ्याने कमेंट करताना विचारला आहे. दीदी मग लग्नाच्यावेळी नाचत होती तेव्हाची एनर्जी आणि पाय कुठून घेऊन आली होतीस, ड्रामाक्वीन, असे एकाने म्हटले आहे. तर एकाने “हमारी दबंग दुल्हनिया”, अशी कमेंट करत एका नेटकऱ्याने ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

“अभिनेत्री होण्याचे माझे स्वप्न नव्हते…”; दिशा पाटनीने केला खुलासा

‘पवित्र रिश्ता’मध्ये आशिता ही अंकिताच्या वहिनीच्या भूमिकेत दिसली होती. अंकिताने सोशल मीडियावर आपले नावही बदलले असून आता तिने तिच्या आडनावासोबत जैन हे आडनावही जोडले आहे.