‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात अंकिता ‘झलकारी बाई’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच झाशीच्या राणीची भूमिका साकारत असलेल्या कंगनाचा लूक सर्वांसमोर आलेला. आता चित्रपटातील अंकिताचा फर्स्ट लूक व्हायरल होत आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता वैभव तत्त्वावादीसुद्धा पाहायला मिळतोय. ‘झलकारी बाई आधुनिक विचारसरणीच्या माणसाच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग जाणते,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. मात्र, यामध्ये अंकिता आणि वैभवचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसून काही कारणांमुळेच तसा फोटो पोस्ट केल्याचंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

https://www.instagram.com/p/BbLtaxJHKtU/

PHOTOS : प्रार्थना बेहरेची लगीनघाई

यापूर्वीही अंकिताने सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अंकिता साकारत असलेली झलकारी बाईची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लक्ष्मीबाईच्या सैन्यातील त्या महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या. राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत त्या नेहमी उभ्या असायच्या.
‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची संहिता ‘बाहुबली’चे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader