लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे अखेर विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईत राजेशाही थाटात अंकिता-विकीचा लग्नसोहळा पार पडला. यात तिचा लूक हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान नुकतंच अंकिता लोखंडेने ३७ वा वाढदिवस साजरा केला. अंकिताचा लग्नानंतर हा पहिलाच वाढदिवस असल्याने तो प्रचंड खास ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिताने तिचा हा वाढदिवस नवरा विकी जैन, तिच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह साजरा केला. याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने अंकिताने एक सिल्कची साडी परिधान केली होती. यात ती प्रचंड सुंदर दिसत होती.

अंकिताने नुकतंच या साडीवरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिने एक प्रिंटेड साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. ही साडी फिकट हिरव्या रंगाची आहे. यावर लाल रंगाची फुल पाहायला मिळत आहे. त्यासोबत यावर विविध रंगात प्रिंट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या साडीची बॉर्डर गोल्डन रंगाची आहे.

अंकिताने ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर जेजे वालया यांच्याकडून खरेदी केली आहे. त्यांच्या साईटवर या साडीचे अनेक फोटोही पाहायला मिळत आहे. या साडीची किंमत तब्बल ७९ हजार ५०० रुपये आहे. विशेष म्हणजे या साडीसोबत एक बेल्टही पाहायला मिळत आहे. त्या बेल्टची किंमत ९ हजार ९०० रुपये आहे.

अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या ‘त्या’ फोटोंवर सुशांत राजपूतच्या बहिणीची कमेंट, म्हणाली…

यासोबत अंकिताने गळ्यात छान मंगळसूत्र परिधान केले होते. हे मंगळसूत्र हिरेजडित आहे. विशेष म्हणजे त्यासोबत तिच्या हातात डायमंडची रिंगही पाहायला मिळत होती. तसेच तिने नववधूप्रमाणे भांगेत कुंकू भरले होते. दरम्यान तिचा हा लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहे. अनेकांनी तिच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande flaunts bridal glow in silk saree with hubby vicky jain for birthday celebrations know the saree price nrp