अंकिता लोखंडे ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये अंकिता लोखंडे प्रसिद्ध व्यावसायिक विकी जैनशी लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर विकी आणि अंकिता आनंदी आयुष्य जगत आहेत. दरम्यान, अंकिता आई होणार असल्याच्या अनेकदा होताना दिसतात. यावर काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अंकिताने, तिचा आणि विकीचा सध्या आई-बाबा होण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण नुकतीच एका टीव्ही शोमध्ये हजेरी लावल्यानंतर अंकिताने आई होण्याच्या प्रश्नावर अशी प्रतिक्रिया दिली की तिच्या ऑनस्क्रीन सासू सविता ताई म्हणजेच अभिनेत्री उषा नाडकर्णी सुद्धा यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला थांबवू शकल्या नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता लोखंडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टेलिव्हिजन रिअॅलिटी शो ‘डीआयडी सुपर मॉम’च्या विशेष आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. या एपिसोडमध्ये अंकिता आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची जोडी एकत्र दिसणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी अंकिताच्या सासूची म्हणजेच सुशांतसिंह राजपूतच्या आईची भूमिका साकारली होती.
आणखी वाचा- आमिर खानने मराठमोळ्या अमृता सुभाषला लिहिलं होतं प्रेमपत्र, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे शोच्या परीक्षक उर्मिला मातोंडकरसह ‘रंगीला’ चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अंकिता आणि उर्मिलाचा डान्स पाहून शोमध्ये उपस्थित भाग्यश्री आणि उषा नाडकर्णी टाळ्या वाजवताना दिसत आहेत. यानंतर शोचा होस्ट जय भानुशाली अंकिताला म्हणतो, “आता सांगूनच टाक तू सुपर मॉम कधी होणार आहेस?” यावर उत्तर देताना अंकिता लहान मुलांसारखा आवाज काढत म्हणते, “सध्या तर मी स्वतःच एक लहान बाळ आहे.”

आणखी वाचा- अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच होणार आई? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

अंकिताच्या या उत्तरावर क्षणाचाही विलंब न लावता उषा नाडकर्णी त्यांच्या नेहमीच्या दमदार शैलीत आपल्या मांडीवर बसण्याचे हावभाव करत तिला म्हणाल्या, “ये, बस” उषा नाडकर्णी यांच्या या कमेंटवर अंकिता आणि परीक्षक रेमो डिसूझा यांच्यासह शोमध्ये उपस्थित सर्वांनाच हसू आवरेनासं झालं. दरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी अलिकडेच गोव्यात व्हेकेशन एन्जॉय केलं. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande funny reply on pregnancy question says i am still baby mrj