बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनशी १४ डिसेंबर रोजी लग्न गाठ बांधली आहे. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी त्यांनी कोट्यावधींचा खर्च केला होता. त्यानंतर अंकिताचा पती विकी जैन कोण आणि तो काय काम करतो असे सगळे प्रश्न अंकिताच्या चाहत्यांसमोर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून (JBIMS) एमबीए केलं. एमबीएची शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने त्याच्या कुटुंबाच्या व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

या ग्रुपचा कोळसा व्यापार, वॉशरी, लॉजिस्टिक, पॉवरप्लांट, रिअल इस्टेट आणि डायमंडमध्ये मोठा व्यवयास आहे. विकीचा कौटुंबिक व्यवसाय हा रिअल इस्टेटमध्येही पसरलेला आहे. महावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. शिवाय, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचं फर्निचरचं शोरूमही असल्याचं वृत्त आहे. विकीचे वडील विनोद जैन हे बिलासपूरमधील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकी एक आहेत. ते प्री-स्कूलचेही गुंतवणूकदार असल्याचे असंही म्हटलं जातं. विकी हा क्रीडाप्रेमी आहे आणि त्याच्या या क्षेत्रातील आवडीमुळे त्याने त्यातही गुंतवणूक केली आहे. तो बॉक्स क्रिकेट लीग (BCL) संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे.

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 नंतर अभिनेता विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

अंकिता लोखंडेचं मुंबई ३ बीएचकेचा फ्लॅट आहे. नुकतंच तिने पतीसोबत मिळून मुंबईत ८ बीएचकेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. हे दोघं त्यांच्या नवीन घरात नुकतेच शिफ्ट होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande husband vicky jain does this business dcp