बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिताला खरी ओळख ही पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली होती. या मालिकेत अंकितासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुत मुख्य भूमिकेत होता. फक्त मालिकेत नाही तर खऱ्या आयुष्यातली त्या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. २०१८ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला तरी २०२० मध्ये सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. या गोष्टीला २ वर्ष झाल्यानंतर अंकिताने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “मी सलमान खानला कधीच घेतल नसतं कारण…”, ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकवर प्रवीण तरडेंच वक्तव्य चर्चेत

स्टार प्लस वाहिनीवर असलेल्या स्मार्ट जोडी या शोमध्ये अंकिता आणि विकीची जोडी स्मार्ट जोडी म्हणून घोषित केली होती. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता म्हणाली, “सुशांतच्या निधनानंतर मला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. सुशांतसाठी अंकिताच बेस्ट होती, तिने सुशांतबरोबरच राहायला हवं होतं असे लोक त्यावेळी म्हणत होते. तर अनेकांनी विकीवर टीका केली. अंकिताला सोडून जाण्याचे सल्ले दिले.”

आणखी वाचा : जुना वाद विसरून सलमान आणि अभिषेक एकत्र? व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘ऐश्वर्या…’

आणखी वाचा : लवकरच येणार The Kashmir Files चा सीक्वेल, शिवसेनेचं नाव घेत विवेक अग्निहोत्री यांची घोषणा!

पुढे अंकिता म्हणाली, “आपल्या एक्स बॉयफ्रेंडविषयी टेलिव्हिजनवर व्यक्त होणं कोणालाच आवडलं नसतं. पण त्यावेळी सुशांतविषयी दररोज नवी माहिती पुढे यायची आणि मी सतत त्याच्याविषयी बोलायची. विकीच्या जागी दुसरा कोणी पुरूष असता तर त्याने मला कधीच सोडलं असतं, पण त्याने माझी साथ दिली. सुशांतसाठी जे चांगले आहे ते तू कर असे त्यावेळी विकी मला म्हणाला होता.”

आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

‘स्मार्ट जोडी’ हा शो मार्चमधे सुरू झाला होता. लग्न झाल्यानंतर विकी आणि अंकिताने लगेचच यात भाग घेतला होता. या शोमध्ये अर्जून बिजलानी-नेहा स्वामी, भाग्यश्री-हिमालय दासानी, नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, नताल्या इलिना-राहुल महाजन, पल्लवी शुक्ला-अंकित तिवारी या जोड्यांचाही समावेश होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande opens up on situation after ex boyfriend sushant singh rajput s death dcp