‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने फक्त टीव्ही जगतातच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. अंकिता लोखंडेचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरून अंकिता कायम आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. सुशांत सिंह राजपूतसोबतच अफेअर आणि नंतर ब्रेकअस असो किंवा आता विकी जैनसोबत असलेलं नातं अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेला ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वासाठी विचारणा करण्यात आल्याच्या चर्चा रंगत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता लोखंडे ‘बिग बॉस-१५’मध्ये झळकणार अशा चर्चा सुरु असतानाच स्वत: अंकिता लोखंडेने यावर प्रतिक्रिया दिलीय. अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ती ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये अशा बातम्या येऊ लागल्या आहेत की मी यावर्षी ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी होणार आहे. मला वाटतं मीडिया आणि सर्वांनी हे नोट करावं की मी बिग बॉस या शोमध्ये सामील होणार नाही. या शोमध्ये मी सहभाग घेणार असल्याचं वृत्त खोटं आहे. मी अशा कोणत्याच गोष्टीचा भाग होणार नसतानाही लोकांनी लगेचच घाई करत मला व्देषपूर्ण प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय.” असं अंकिता तिच्या पोस्टमध्ये म्हणालीय.

हे देखील वाचा: ‘चोली के पिछे क्या है’ गाण्याचा ‘तो’ व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई भावूक

गेल्या वर्ष भरापासून ‘बिग बॉस १५’मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यामुळे सोशल मीडियावरून अनेक नेटकऱ्यांनी अंकितावर निशाणा देखील साधला होता. अंकिता केवळ प्रसिद्धीसाठी आता ‘बिग बॉस’मध्ये सामील होवून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या मुद्दयावर लोकांचा सपोर्ट मिळवणार अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत्या. मात्र आता अंकिता लोखंडेने तिची प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

दरम्यान अंकिता लोखंडे निर्माती एकता कपूरसोबत सध्या ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेच्या सिक्वलवर काम करतेय. या शोचं स्क्रीप्ट जवळपास तयार असून हा शो ओटीटीवर प्रसारित होणार आहे. तर या शोमध्ये अर्चनाची भूमिका अंकिता लोखंडेच साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande refused participating in big boss 15 said its a rumors kpw