बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. काल १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या लग्नातील फोटोपासून आलियाच्या मंगळसूत्राची चर्चा सुरु आहे. पण रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या दिवशी अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) असे काही केले की ती सोशल मीडियावर ट्रोल होतं आहे.
१४ एप्रिल रोजी अंकिता आणि विकी जैनच्या( Vicky Jain) लग्नाला ४ महिने पूर्ण झाले आहेत. यावेळी अंकिताने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. तर त्याच दिवशी रणबीर आणि आलियाचं लग्न झालं म्हणून अंकिताने हे फोटो शेअर केले असे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा : लग्न आलिया रणबीरचं पण चर्चा तैमूरच्या Attitude ची, पाहा Viral Video
आणखी वाचा : “छातीवरचे आणि पाठीवरचे केस…”, शक्ती कपूर यांची ही मजेदार जाहिरात होतेय व्हायरल
रणबीर-आलियाच्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यावर यूजर्स अंकिताला जेलस (Jealous) म्हणत तिला ट्रोल करत आहेत. अंकिताच्या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “जेव्हा कोणाच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर स्वत:च्या लग्नाचे फोटो दाखवण्याची इच्छा होते…खूप झालं आता बस कर.” दुसरा नेटकरी म्हणाला, “असुरक्षित वाटून घेण्याची पण एक हद्द असते…आलिया रणबीरच्या लग्नाचे फोटो पाहून इतकं वाईट वाटतयं.” तिसरा नेटकरी म्हणाला, “तू कायम स्वत:ला जेलेस (Jealous) फील करते. हे फोटो आता पोस्ट करण्याची काय आवश्यकता आहे? आलिया आणि रणबीर यांना या सगळ्याचा आनंद घेऊ दे,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केले आहे.