भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. पण या सगळ्यात आता बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतं आहे.

एकीकडे संपूर्ण देश हा लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत सगळेच त्यांना श्रद्धाजंली वाहत आहेत. तर दुसरीकडे अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता पती विकी जैनसोबत कारमध्ये असल्याचे दिसत आहे. अंकिता ही बिजली बिजली गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओत अंकिता आनंदी असल्याचे दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

Lata Mangeshkar : “मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”, पाकिस्तानमध्ये सुनील गावस्कर यांनी घेतला होता अपमानाचा बदला

अंकिताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “जरा लाज बाळग. एकीकडे लतादीदींच्या निधनावर संपूर्ण देश शोक करत आहे, दुसरीकडे तुम्ही नाचत आहात आणि आनंद लुटतानाचा हा व्हिडिओ पोस्ट करत आहात. एवढंच काय तर तुम्ही एकाच चित्रपटसृष्टीतून असताना. एक निर्लज्ज स्त्री जिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मृत्यूमुळे लोकप्रियता मिळाली.” दुसरा नेटकरी म्हणाला, “लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.” तिसरा नेटकरी म्हणाला, “त्यांच्या दुखात शामिल तरी हो हे काय कधीही करू शकते.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “मुर्ख स्त्री लतादीदी सुद्धा इंदौरच्या होत्या आणि तू सुद्धा. थोडी तरी लाज बाळग. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : “आपण भेटू असं आमंत्रण दिलं होतं आणि आज…,” लतादीदींच्या आठवणी शेअर करत समीर चौगुलेने वाहिली श्रद्धांजली

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.

आणखी वाचा : “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण…”, लतादीदींचा जुना व्हिडीओ व्हायरल

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

Story img Loader